गोपनीयता धोरण

तुमची गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचा विश्वास आणि आत्मविश्वास कायम ठेवण्याला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो. आम्ही सुरक्षित व्यवहाराची खात्री करतो आणि उच्च दर्जाच्या ग्राहक गोपनीयता धोरणाचे अनुसरण करतो.

आम्ही येथे आमच्या माहिती संकलन आणि प्रसारणाच्या कार्यपद्धती निर्दिष्ट केल्या आहेत.

आमच्या वेबसाइटचा वापर करण्याद्वारे तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणाच्या नियम आणि अटींशी बांधील असल्याचे मान्य करता. तुम्ही सहमत नसाल तर कृपया आमच्या वेबसाइटवर प्रवेश घेऊ नका किंवा वापर करू नका. हे धोरण कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही बदलण्याचा अधीन आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणाकडे त्यात वेळोवेळी होणाऱ्या बादलांबाबत अद्ययावत राहण्यासाठी वारंवार लक्ष ठेवत जा. या गोपनियता धोरणात वापरलेले शब्द जसे "आम्ही" किंवा "आमचे" किंवा "आम्हाला" आणि "कंपनी" मेडी असिस्ट इंडिया TPA प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या वर्तमान आणि भविष्यातील संलग्न संस्थांना संदर्भित आहेत.

माहितीचा संग्रह आणि वापर

तुम्ही आमच्या वेबसाइटचा वापर करता तेव्हा आम्ही अनिवार्य व बिगर-अनिवार्य या प्रकारे वर्गीकृत केलेली काही वैयक्तिक आणि गैर-वैयक्तिक माहिती गोळा करतो.

वैयक्तिक माहितीत तुमचे नाव, जन्म तारीख, लिंग, तुमचा टेलिफोन आणि मोबाइल नंबर यासारखी संपर्क माहिती, रहिवासी पत्ता, ई-मेल आयडी इ. चा समावेश होईल परंतु तेवढेच मर्यादित नाही. आमच्या काही सेवांचा वापर करताना युजर आयडी निर्माण करण्यासाठी किंवा आमच्या वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी किंवा आमच्याकडे ऑर्डर प्लेस करताना वित्तीय माहिती देण्यासाठी, आमच्या ग्राहक सेवा सोबत फोन करुन, ई-मेल द्वारे संपर्क करण्यासाठी किंवा अन्यथा आम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देणे आवश्यक आहे. तुम्ही आम्हाला तुमची माहिती न देता वेबसाइट पाहू शकता पण अशा बाबतीत तुम्ही वेबसाईटचा काही विभागात प्रवेश करु शकणार नाही ज्यामुळे तुम्ही आमच्या काही सेवांना गमावू शकता.

तसेच तुम्हाला तुमच्याबद्दलची काही वैयक्तिक संवेदनशील माहिती जसे तुमचे प्रिस्क्रिप्शन समाविष्ट पण तेवढ्यापुरतेच मर्यादित नसलेले तुमचे मेडिकल रेकॉर्ड, टेस्ट रिपोर्ट, आधीचा वैद्यकीय इतिहास इ. देणे आवश्यक असेल. आम्ही समजतो की ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत खाजगी आहे आणि तुम्हाला खात्री देतो की या माहितीचा वापर केवळ आमच्याद्वारे प्रस्तुत करण्याचे सामंजस्याने मान्य केलेल्या आवश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी केला जाईल. तसेच आमच्यासोबत तुम्हाला तुमचे मेडिकल रेकॉर्ड अपलोड करायचा आणि संयचित करण्याचा विशेषाधिकार दिला जातो आणि फक्त तुम्ही तुमचा युनिक युजर आयडी वापरून ते पाहू शकता. यामुळे तुम्ही जगात कुठेही असले तरी एका क्लिक ने कुठेही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड पाहण्यास तुम्हाला मदत होईल. आम्ही पुन्हाः सांगतो की तुमच्या शिवाय कोणीही हे रेकॉर्ड पाहू शकणार नाही आणि हेच रेकॉर्ड आम्हाला प्रेषणाच्या मार्गातच हॅक आणि विसंकेतन होणे टाळण्यासाठी एनक्रिप्टेड स्वरूपात प्रेषण केले जातील.

तसेच तुम्ही आमच्यासोबत व्यवहार केला तर, आम्ही तुमची काही अतिरिक्त माहिती जसे तुमचा बिलिंग पत्ता, क्रेडिट/ डेबिट कार्ड क्रमांक आणि क्रेडिट/ डेबिट कार्ड समाप्ति दिनांक आणि/किंवा इतर देय उपकरण तपशील गोळा करु.

आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही केवळ तुमचा अनुभव त्रास-मुक्त, सोयीस्कर, सुलभ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षित करण्यासाठी पूर्णपणे आवश्यक आणि आमच्यासाठी संबद्धित माहिती गोळा करु. तुम्हाला सानुकूलित सेवांचे प्रदान, तुमच्या सर्व शंकांबाबत सहाय्य आणि तुम्हाला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या दुरुस्त करण्यासाठी, एक दीर्घकालीन, स्थायी संबंधाच्या सुनिश्चिततेसाठी तुमचा पाठपुरावा करण्यासाठी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारची फसवेगिरी आणि बेकायदेशीर वापरा पासून तुमचे रक्षण करण्यासाठी आम्हाला यामुळे मदत होईल.

आम्ही वेबसाईटच्या काही पृष्ठांसाठी “cookies” सारख्या डेटा संग्रह साधनांचा वापर करतो यामुळे आमच्या वेबपृष्ठांच्या प्रवाहाचे विश्लेषण करण्यात मदत होते आणि विश्वास आणि सुरक्षितता वाढते. “cookies” या लहान फाईल्स असतात ज्या तुमच्या हार्ड ड्राइव्हवर ठेवल्या जातात ज्या आमच्या सेवा प्रदान करण्यात आम्हाला सहाय्य करतात. आम्ही काही फिचर देतो जे केवळ कुकीज च्या वापराच्या माध्यमातून उपलब्ध होतात.

आम्ही सत्राच्या दरम्यान कमी वारंवारपणे तुमचा पासवर्ड प्रविष्ट करण्याची तुम्हाला परवानगी देण्यासाठी देखील कुकीज वापरतो. बहुतेक कुकीज या "सीजन कुकीज" असतात म्हणजे की त्या सत्राच्या शेवटी आपोआप तुमच्या हार्ड ड्राइव्ह पासून हटविल्या जातात आहेत. जर तुमचा ब्राउझर तुम्हाला परवानगी देत असेल तर तुम्ही आमच्या कुकीज नाकारण्यासाठी मुक्त आहात, तथापि आमच्या सर्व सेवांना प्रवेश करण्यासाठी आम्ही ठामपणे शिफारस करतो की तुम्ही त्यांना परवानगी द्यावी.

माहिती सामायिक करणे:

आम्ही तुमच्या गोपनियतेचा आदर करतो आणि याद्वारे जाहिर करतो की आम्ही खालील अपवाद वगळता तुमची माहिती उघड करणार नाही:

  • कायद्याच्या सम्यक प्रक्रियेद्वारे मंजूर केल्यानंतर मोठ्या सामान्य सार्वजनिक हितसंबंध असलेल्या अन्वेषणासी संबंधात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत
  • आमच्या सहकारी आणि संबंधितांना फसवणूक, चोरी आणि इतर बेकायदेशीर कारवायांचा शोध घेण्यासाठी आणि त्या रोखण्यासाठी, आमच्या सेवांचा गैरवापर रोखण्यासाठी परस्परांशी संबंधीत किंवा एकाधिक खाती ओळखण्यासाठी मदत करण्यासाठी; आणि जिथे एकापेक्षा अधिक कॉर्पोरेट संस्थेद्वारे अशा सेवा प्रदान केल्या आहेत जेथे संयुक्त किंवा को-ब्रॅंडेड सेवांच्या ज्यांची तुम्ही विनंती केली होती त्यांच्या सुलभीकरणासाठी
  • कंपनी पुनर्रचना करताना किंवा इतर कोणत्याही संस्थेद्वारे ताबा घेतल्यास आम्ही आमच्या सहकारी किंवा संबंधितांसोबत सुद्धा अशी माहिती सामायिक करु शकतो तरीही अशा घटनेत अन्य संस्था काटेकोरपणे या धोरणाचे अनुसरण करतील याची खात्री करु.
  • तुम्हाला आरोग्य तपासणीसाठी बुकींग करताना किंवा ऑनलाइन खरेदी करताना तुमची वित्तीय माहिती सादर करणे आवश्यक असेल. आम्ही एक ऑनलाइन पेमेंट गेटवे वापरतो जे तृतीय पक्षाद्वारे हाताळले जातात आणि तुम्ही दिलेली क्रेडिट-कार्ड तपशीलांसारखी अत्यंत संवेदनशील माहिती ज्यांचा व्यवहार स्वीकृत पेमेंट गेटवेच्या सुरक्षित साईट वर केला जातो जी डिजिटलस्वरुपात एनक्रिप्शनच्या अंतर्गत असतात, ज्यामुळे वर्तमान तंत्रज्ञानानुसार काळजीची सर्वोच्च शक्य दर्जाची सुरक्षा प्रदान करतात.

तृतीय पक्ष वेबसाईटसाठी जाहिराती आणि लिंक:

आमच्या वेबसाइटवर तृतीय-पक्ष वेबसाईटच्या काही जाहिराती आणि लिंक असू शकतात. आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही यांना नियंत्रित करीत नाही किंवा या जाहिरातदार आणि तृतीत पक्ष वेबसाईटने तुम्हाला दिलेल्या माहितीची, अचूकता, सुरक्षा आणि प्रामाणिकपणाची गॅरंटी देत नाही. म्हणून असा सल्ला दिला जातो की तुम्ही या वेबसाइटवर स्वत: बद्दल कोणतीही माहिती प्रदान करण्यापूर्वी त्यांचे गोपनीयता धोरण पाहण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो.

सुरक्षितता काळजी:

आमच्याजवळ असलेल्या तुमच्या माहितीचे नुकसान, गैरवापर किंवा बदल विरुद्ध खात्री करण्यासाठी आमच्याकडे कठोर, मजबूत सुरक्षा उपाय केले जातात. तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही अनधिकृत वापरापासून तीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ. आमच्यासोबत असलेल्या तुमच्या माहितीचे रक्षण करण्यासाठी आमच्याकडे Verisign द्वारे जारी केलेले SSL प्रमाणपत्र आहे आणि कोणत्याही चोरी किंवा त्याचा बेकायदेशीर वापर किंवा फेरबदलच्या विरुद्ध इतर सुरक्षा उपाय केले जातात. तथापि इंटरनेट तंत्रज्ञान 100% सुरक्षित नाही, आणि तुम्हाला याचा वापर विवेकाने करायचा सल्ला दिला जातो.

या पॉलिसी किंवा इतरत्र काहीही अंतर्भूत असले तरी, नैसर्गिक आपत्तीच्या घटनेत (खाली व्याख्या केल्याप्रमाणे) आम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीचा कोणताही तोटा, नुकसान किंवा गैरवापरासाठी जबाबदार धरले जाणार नाही.

नैसर्गिक आपत्ती चा अर्थ होतो की कोणतीही अशी घटना जी मेडी असिस्टच्या उचित नियंत्रणाच्या पलीकडे आहे ज्यात घातपात, आग, पूर, स्फोट, नैसर्गिक विपत्ती ,नागरी गोंधळ, संप किंवा कोणत्याही प्रकारची औद्योगिक कारवाई, दंगे, दंगली, बंड, युद्ध, सरकारची कार्ये, संगणक डेटा आणि स्टोरेज साधनात अनधिकृत प्रवेश, संगणक क्रॅश होणे, सुरक्षा आणि एनक्रिप्शन चा भंग, इ. चा समावेश होतो पण तेवढेच सीमित नाही.

संमती:

आमची वेबसाइट वापरून आणि तुमची माहिती प्रदान करून तुम्ही या गोपनियता धोरणाच्या अटींनुसार आमच्याद्वारे तुमच्या माहितीचे संकलन आणि वापरासाठी संमती देता आहात. गोपनीयता धोरणात आमच्याद्वारे केलेल्या कोणत्याही बदलासाठी स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी कृपया हा विभागावर वारंवार लक्ष देत रहा.

तक्रार अधिकारी:

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि त्या अन्वये केलेल्या नियम नुसार आपल्या सर्व शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी तक्रार अधिकारीचे नाव आणि संपर्क तपशील येथे प्रदान केले आहेत.

तक्रार अधिकारी:

ई-मेल आयडी: grievance.officer@mediassistindia.com
संपर्क संख्या: +91 80 4969 8000

मेडी असिस्ट इंडिया TPA ्रायव्हेट लिमिटेड टॉवर डी, 4 था मजला, IBC नॉलेज पार्क, 4/1 बॅनरगट्टा रोड, बंगलोर - 560029

नियामक नियम आणि कायदा:

तुम्ही वेबसाइटला भेट देण्याचे निवडल्यास, तुमची भेट आणि गोपनीयतेवरील कोणतेही वाद या पॉलिसी आणि वेबसाइट वापराच्या अटींच्या अधीन राहतील. मागील व्यतिरिक्त, या पॉलीसीच्या अंतर्गत उद्भवणारे कोणतेही विवाद भारताच्या कायद्यान्वये नियमित केले जातील.